म.टे.ए. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष स्व. धोंडूमामा साठे यांची जयंती उत्साहात साजरी

Dhondumama Sathe

Founder - MTES

महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. धोंडोकृष्ण उर्फ धोंडूमामा साठे यांची दि.०१/०९/२०१७ रोजी १२७ वी जयंती सोसायटी शाळेच्या सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करणेत आली याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून  एम.टी.इ.सोसायटीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयचे माजी प्राचार्य प्रा. एच.यु. कुलकर्णी हे होते. या प्रसंगी धोंडूमामा साठे यांच्या जीवन कार्याबद्दल अनेक विचारवंतानी आपली मते व्यक्त केली.

प्रा.एच.यु. कुलकर्णी यांनी कै. धोंडूमामा साठे यांचे अनेक वर्ष सहकारी म्हणून काम केले आहे. त्यांनी धोंडूमामा साठे यांच्या जिवन कार्याबद्दल व अनुभवाबद्दल बोलताना म्हणाले “कै.धोंडूमामा हे द्विपदवीधार होते. आय.ए.एस. होण्यासाठी ते लंडन येथे शिकावयास गेले परंतू त्यांच्या मोठ्या बंधूचे निधन झाल्याने त्यांना व्यवसाय सांभाळण्यासाठी परत भारतात यावे लागले. सन १९४५ साली आपला देश स्वतंत्र होणार हे लक्षात घेउन त्यांनी देशाला अभियंत्याची लागणारी गरज विचारात घेउन त्यांनी अहोरात्र कष्ट करुन सांगली मध्ये भारतातील पहिले विनाअनुदान तत्वावरील अभियांत्रिकी महाविद्यालय सन १९४७ साली स्थापन केले. त्याचे पुढे मिळालेल्या देणगी मुळे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय असे नामकरण केले गेले.धोंडूमामांच्या पुण्याई मुळे स्थापन झालेल्या या महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या अनेक अभियंत्यांनी देश घडणीसाठी मोठा हातभार लावला आहे. याशिवाय धोंडूमामांनी बॅंक ऑफ महाराष्ट्र ची ही स्थापना करुन आर्थीक क्षेत्रामध्ये आपले मोठे योगदान दिले. असे धोंडूमामा साठे हे अष्ट पैलू व्याक्तिमत्व होते. त्यावेळी कै. धोंडूमामांच्या बरोबर काम करणेची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. अशा थोर व्यांक्तींची आठवण पुढील पिढीने ठेवायला हवी.

या प्रसंगी कृषी कार्यानुभव प्रकल्पाचे उदघाटन करताना शेती तज्ञ मा. श्री. मुनीर मुल्ला यांनी सांगीतले धोंडूमामांचे खरे तर याठिकाणी अभियंत्रिकी महाविद्यालय बरोबर कृषी विद्यालय चालू करणेचे ध्येय होते ते त्यांचे अपूरे राहिलेले कार्य आपण शाळेतील विद्यार्थ्यांना शेतीतील अनूभव देवून पुढे घेउन जाणार आहोत. 

दै. पुढारीचे संपादक मा.श्री.चिंतामणी सहस्त्रबुध्दे यांनी आपले विचार मांडताना कै. धोंडूमामा साठे हे चिंतरंजन बोस यांच्या परंपरेतील विद्ववान आणि त्यागी व्याक्तिमत्व होते केवळ, त्यांच्यामुळेच महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या वालचंद महाविद्यालयाचे काम उभे राहू शकले त्यांच्या  विचारांची प्रेरणा घेऊन सामान्य व्याक्तीनेही देशासाठी लहान मोठे कार्य करुन देश सेवेसाठी हातभार लावला पाहीजे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असे मत व्याक्त केले.

कार्यक्रम सोसायटीचे सचिव प्रा. श्रीराम कानिटकर व सहसचिव श्री. सुरेंद्र चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. प्रभाकर खाडिलकर यांनी केले व सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केळकर, संचालक अड. श्री. विवेक कुलकर्णी व श्री. चंद्रशेखर भिडे यांच्या हस्ते पाहूण्यांचा सत्कार करणेत आला. मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कुलकर्णी यांनी आभार मानताना प्रमुख पाहूणे संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक पालक व कर्मचारी यांचे आभार मानले. याप्रसंगी संचालक श्री.हणमंत ग्रामोपाध्ये, निवृत्त कर्नल व संस्था सदस्य श्री. विलास हारुगडे, माधव गोडबोले, डॉ. व्होरा, डॉ.प्रा. जयंत गाडगीळ तसेच प्रा. मोहन खिरे हे उपस्थित होते. शाळेच्या उपस्थित पालकांनी कृषी संबधी उपक्रमाचे कौतुक केले.

Disclaimer: The Data published on our website is modified / rectified on 15th of every month generally. Therefore, for the correct & legal status of information published on the website,
please contact Secretary, M.T.E. Society, Pune on 'secretary@mtespune.org'.