सन १९४५ साली स्व.धोंडूमामा साठे यांनी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी (एम.टी.इ.एस.)ची स्थापना केली.त्यावेळी त्यांच्या सोबत सन्मा.श्री.दत्तो वामन पोतदार,श्री.पदमजी, श्री.सी.जी.आगाशे, श्री.एम.व्ही.भिडे, श्री.एम.व्ही.शहा, श्री. आर.जी. सुळे तसेच त्यांचे इतर सहकारी कार्यरत होते.
स्व. धोंडुमामा यांनी महाराष्ट्र् टेक्निकल एज्युकेशन सोसायटी मार्फत सन १९४७ साली विश्रामबाग-सांगली येथे भारतातील पहिले विनाअनुदानित अभियांत्रीकि महाविद्यालय “न्यू इंजिनिअरींग कॉलेज” या नावे चालू केले. सन १९५६ साली त्याचे नामांतर म.टे.ए.सोसायटीचे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय असे केले गेले व तदनंतर शासन अनुदानित महाविद्यालय म्हणून त्याची प्रगती होत गेली. सध्या हे महाविद्यालय “स्वायत्त महाविद्यालय” म्हणून कार्यरत आहे.
सन १९७१ साली म.टे.ए.सोसायटीने पुणे येथे होमिओपॅथिक महाविद्यालया ची स्थापना केली. सध्या हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य असे महाविद्यालय असून धोंडूमामा साठे होमिओपॅथी महाविद्यालय या नावाने प्रसिध्द आहे.त्यानंतर न्यायमुर्ती महादेवराव रानडे होमिओपॅथी हॉस्पिटल तसेच पुण्यातील सध्या सुप्रसिध्द असलेले संजीवन मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल ची ही स्थापना केली.