महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेचा ७६ वा स्थापना दिवस दि.०१/०९/२०१७ रोजी विश्रामबाग सांगली येथील विभागीय कार्यालयामध्ये उत्साहात साजरा करणेत आला. संस्थेच्या वतीने चेअरमन मा. पृथ्वीराज देशमुख, प्रा.एस.जी.कानिटकर, व्हाईस चेअरमन डॉ. प्रसाद केळकर, सचिव अॅड. विवेक कुलकर्णी, सहसचिव श्री. सुरेंद्र चौगुले व इतर मान्यवरांच्या हस्ते म.टे.ए.सोसायटीच्या वालचंद महाविद्यालयातील संस्थापक कै. धोंडूमामा साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणेत आला.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक कै. धोंडूमामा साठे यांच्या अनमोल कार्याचे स्मरण करण्यात आले, कै. धोंडूमामा साठे यांनी सुसज्ज व सक्षम स्वतंत्र भारत निर्माण करणेसाठी नव्या आव्हानांना तोंड देता येणेसाठी काळाची गरज ओळखून सांगली शहरात भारतातील सर्वात पहिले विनाअनुदानीत अभियांत्रिकी महाविद्यालय न्यु इंजिनिअरिंग कॉलेज (म.टे.ए. सोसायटीचे वालचंद महाविद्यालय) उभे केले. तसेच संस्थेने धोंडूमामा साठे होमिओपॅथीक महाविद्यालय, संजीवन हॉस्पिटल, न्यायमूर्ती माधवराव रानडे मेमोरियल होमिओपॅथीक हॉस्पिटल, म. टे. ए. सो. चे कनीष्ठ विद्यालय, इंग्लिश स्कूल (CBSE) व मराठी प्राथमिक शाळेची ही स्थापना केली.
या प्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. विनायक पवार एम.टी.इ.एस. इंग्लिश स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. हेजल बेलशर, मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती कुलकर्णी, बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता जोशी, प्री-प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.संपदा केळकर तसेच सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी वर्ग, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचा स्थापना दिन उत्साहात साजरा
Dhondumama Sathe
Founder - MTES
Founder - MTES