संस्थेविषयी
    • महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, पुणे. -

           स्थापना - सन १९४५ साली स्व.धोंडूमामा साठे यांनी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी (एम.टी.इ.एस.)ची स्थापना केली.त्यावेळी त्यांच्या सोबत सन्मा.श्री.दत्तो वामन पोतदार,श्री.पदमजी, श्री.सी.जी.आगाशे, श्री.एम.व्ही.भिडे, श्री.एम.व्ही.शहा, श्री. आर.जी. सुळे तसेच त्यांचे इतर सहकारी कार्यरत होते.

           स्व. धोंडुमामा यांनी महाराष्ट्र् टेक्निकल एज्युकेशन सोसायटी मार्फत सन १९४७ साली विश्रामबाग-सांगली येथे भारतातील पहिले विनाअनुदानित अभियांत्रीकि महाविद्यालय “न्यू इंजिनिअरींग कॉलेज” या नावे चालू केले. सन १९५६ साली त्याचे नामांतर म.टे.ए.सोसायटीचे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय असे केले गेले व तदनंतर शासन अनुदानित महाविद्यालय म्हणून त्याची प्रगती होत गेली. सध्या हे महाविद्यालय “स्वायत्त महाविद्यालय” म्हणून कार्यरत आहे.

           सन १९७१ साली म.टे.ए.सोसायटीने पुणे येथे होमिओपॅथिक महाविद्यालया ची स्थापना केली. सध्या हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य असे महाविद्यालय असून धोंडूमामा साठे होमिओपॅथी महाविद्यालय या नावाने प्रसिध्द आहे.त्यानंतर न्यायमुर्ती महादेवराव रानडे होमिओपॅथी हॉस्पिटल तसेच पुण्यातील सध्या सुप्रसिध्द असलेले संजीवन मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल ची ही स्थापना केली.

           त्यानंतर, सुमारे ३० वर्षानंतर सोसायटीने सन २००२ मध्ये पुणे येथे    ’इंस्टीट्युट ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट’ ची स्थापना केली.

           त्यानंतर अनेक अडी-अडचणीवर मात करत सध्याचे सोसायटीचे चेअरमन- मा.श्री.पृथ्वीराज(बाबा) देशमुख, सचिव - मा.प्रा.श्रीराम कानिटकर व सहसचिव- मा.श्री. सुरेंद्र चौगुले, यांनी विश्रामबाग-सांगली येथे सोसायटी मालकीच्या जागेवर सन २०१२ व सन २०१३ साली अनुक्रमे इंग्लिश प्रायमरी स्कूल  (CBSE PATTERN) व नवीन प्राथमिक शाळा (मराठी माध्यम) ची स्थापना केली. सध्या या शाळा सोसायटीने नव्याने बांधलेल्या सर्व सोयीनी युक्त प्रशस्त इमारतीमध्ये चालू असलेल्या दिसत आहेत.

           सन २०१५ मध्ये कै. प्रा.आर.एस. तिलवल्ली यांच्या स्मरणार्थ त्यांच्या वारसांनी सोसायटीला शैक्षणीक मदत म्हणून दिलेल्या देणगी रक्कमेमध्ये पुणे व सांगली येथे सोसायटीने “कै. आर.एस. तिलवल्ली व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर” ची स्थापना केली. सन २०१४ साली सोसायटीने लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग विश्रामबाग येथे “वालचंद अकॅडमी ऑफ करिअर गायडन्स” या नावाने चालू करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करणेचा प्रयत्न केला. चालू वर्ष  सन २०१६ मध्ये सोसायटीने विश्रामबाग येथील संस्थेच्या नवीन इमारतीमध्ये  परिसरातील ज्येष्ठ नागरीक, विद्यार्थी व वाचकांसाठी सांगली (जिल्हा) नगरवाचनालय च्या मदतीने भव्य दिव्य असे वाचनालय केंद्र सुरु केले आहे. या वाचनालयामध्ये हजारो पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत.

    आमच्या संस्थेचे संस्थापक – कै. धोंडूमामा साठे यांच्या विषयी थोडक्यात:-

           स्व. धॊंडुमामा साठे यांचे जन्म सन १८९० साली, एका सदन कुटूंबामध्ये झाला. लोक त्यांना प्रेमाने धोंडूमामा असे म्हणत. त्यांचे शिक्षण पदवीव्यूत्तर पर्यंत झालेमूळे त्यांना सर्व सामान्य विद्यार्थ्यांपुढील निर्माण होणा-या शैक्षणीक अडचणींची जाणीव होती.  शिक्षणानंतर नोकरीचे मागे न लागता त्यांनी स्वत:चा व्यवसाय चालू करणेस प्राधान्य दिले. त्यांचा स्टील हार्डवेअरचा मोठा व्यवसाय होता ते एक दृष्टे स्वातंत्र्यसेनानी, स्थापत्य व्यावसायिक व एक समाज सेवक होते. स्व.धोंडूमामा यांनी सन १९४५ साली महाराष्ट्र् टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे ची स्थापना करुन शिक्षण क्षेत्रामध्ये यशस्वी पाउल टाकले. पुढे त्यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्र ची ही स्थापना केली. अशा प्रकारे या कर्तबगार पुरुषाने महाराष्ट्रामध्ये व पर्यायाने भारत देशामध्ये उध्योग, व्यवसाय, शिक्षण,आर्थीक व वैद्यकिय क्षेत्रांची स्थापणा करून समाजासमोर एक वेगळा ठसा उमटविणेचा प्रयत्न केला.

    स्व.धोंडूमामा साठे यांनी एक स्थापत्य व्यावसायीक म्हणून खालील इमारती उभ्या केल्या.

    • न्यायमुर्ती महादेवराव रानडे होमिओपॅथिक हॉस्पिटल,पुणे.
    • सर परषुरामभाऊ कॉलेज, पुणे.
    • न्यु. इंग्लिश स्कूल, पुणे.
    • आर्यन एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल, मुंबई.
    • रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई.
    • जानी बिल्डींग, मुंबई.

 

Disclaimer: The Data published on our website is modified / rectified on 15th of every month generally. Therefore, for the correct & legal status of information published on the website,
please contact Chairman, M.T.E. Society, Pune on 'chairman@mtespune.org'.